डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५००० वृक्ष लागवडीच्या राष्ट्रवादीच्या संकल्पाचा शुभारंभपहिल्या टप्प्यात उस्मानाबाद शहरात ३००० वृक्ष लावणार...


पर्यावरणाच्या रक्षणासाठी किमान ३३ टक्के जंगल असणे गरजेचे आहे. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून जागतिक पातळीवर व आपल्या देशात देखील ग्लोबल वॉर्मिंग मोठी समस्या बनली आहे.जिच्यामुळे ऋतुमान बदलत चालले आहे व अवर्षण, दुष्काळ यासारख्या समस्या वाढीला लागल्या आहेत. यात सुधारणा झाली नाही तर आपल्या प्राणवायूची व्यवस्था स्वत:लाच करण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.उस्मानाबाद शहराची राज्यात 'ग्रीन सिटी' म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी  राष्ट्रवादीच्या वतीने वृक्ष लागवडीची मोहिम हाती घेण्यात आली असून डॉ.पद्मसिंह पाटील साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज १ जुन ला जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अमोलभैय्या पाटोदेकर यांच्या हस्ते देवीमंदिर येथे वृक्ष लागवड करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


शिरपूर शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावगड केल्याने तेथील तापमान आजूबाजूच्या शहरांच्या पेक्षा २-३ डिग्रीने कमी आहे. त्याच धर्तीवर आपल्या शहरात देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून वाढत्या तापमानात कांही प्रमाणात तरी दिलासा मिळावा यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडावी, व पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक असलेल्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे. आपल्या कुटुंबियांच्या नावाने एका वृक्षाची जोपासना केली तरी फार मोठं काम होणार आहे.ज्यांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्ष देण्यात येणार आहे. मात्र त्या वृक्षाचे संगोपन करण्याची जबाबदारी जे घेतील त्यांनाच यात सहभागी केले जाणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर २००० वृक्ष लावले जाणार असून उर्वरित ३००० हे प्रभाग निहाय जनतेच्या मागणीप्रमाणे देण्यात येणार असून नागरिकांनी एक वृक्ष दत्तक घेऊन त्याची वाढ होईपर्यंत जबाबदारी घेतली तर हे काम अधिक परिणामकारक होईल अशी अपेक्षा यानिमित्ताने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शहरातील धारासूर मर्दिनी देवी मंदिर येथे जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष अमोलभैय्या पाटोदेकर यांच्या हस्ते देवीमंदिर येथे वृक्ष लागवड करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विश्वस्त रावसाहेब डोके, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, पांडुरंग लाटेसर, युवराज नळे, राजसिंह राजेनिंबाळकर, माणिक बनसोडे, अभय इंगळे, बबलू शेख, गणेश खोचरे, अभिजित काकडे, बापू पवार, दत्ता पेठे, अशोक पेठे, इस्माईल शेख, इलियास पिरजादे, चंद्रकांत काकडे, सिधोजीराजे राजेनिंबाळकर, मनोगत शिनगारे, कुणाल निंबाळकर, नागाप्पा पवार, प्रल्हाद धत्तुरे, महेश बागल, महादेव माळी, खलील पठाण, संभाजी सलगर, नाना घाटगे, संग्राम बनसोडे, विलास लोंढे, मेसा जानराव, सुनील जानराव, पुष्पकांत माळाले, अजय यादव, सलमान शेख, अक्कू पठाण, विशाल पाटील, रमेश बनसोडे, महेश काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या