चिमुकल्यांनी पथनाट्यातून दिला व्यसनमुक्तीचा संदेश रिपोर्टर: दिनांक 26/6/2019 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त  व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिनानिमित्त  यश मेडिकल फाउंडेशन व फ्युजन डान्स ड्रामा  ॲकॅडमी कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे सामाजिक न्याय जागर दिंडी सहभागी होऊन सकाळी आठ वाजता नशामुक्त पथनाट्य चिमुकल्यांनी सादर केले.यातून दारू,तंबाखू,गुटखा व इतर मादक द्रव्य मानवी शरीरास किती घातक आहेत हे पथनाट्यातून सादर केले.त्यानंतर सकाळी अकरा वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे व्यसनमुक्तीची नाटिका सादर केली.यावेळी डॉ संजयजी कोलते (जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी,) डॉ संजय तुबाकले (उप मु.का.अ)श्री.बी.एच.निपाणीकर (उप.मु.का.अ.महिला व बाल कल्याण) श्रीमती.सविता भोसले (शिक्षणाधिकारी प्राथ.)श्री गजानन सुसर (शिक्षणाधिकारी माध्य.) डॉ. एन. बी.आघाव (जि.पशु संवर्धन अधिकारी),डॉ. टी.जी.चिमनशेट्टी(कृषी विकास अधिकारी),चौगुले(समाज कल्याण अधिकारी),.शेखर शेटे(मु.ले.व वित्त अधिकारी)श्री.पांडुरंग मते व श्री.अमित जाधव हे उपस्थित होते.या मान्यवरांनी चिमूकल्यांचे कौतुक केले.त्यानंतर दुपारी या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन,उस्मानाबाद येथे व्यसनमुक्ती वरील पथनाट्य सादर केले यावेळी दीपा मुधोळ-मुंडे(जिल्हाधिकारी, उस्मानाबाद),श्री.आर.राजा(जिल्हा पोलिस अधीक्षक),शिवकांत चिकूर्ते(सहाय्यक आयुक्त),श्री चौगुले साहेब(जिल्हा समाज कल्याण अधिकारी),व जिल्ह्यातील इतर सर्व अधिकारी,कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.हा कार्यक्रम तीन टप्प्यात पार पडला.या विद्यार्थ्यांना यश फौंडेशनचे सर्वेसर्वा डॉ.संदीप तांबारे सर व फ्युजन डान्स ड्रामा अकॅडमी चे प्रमुख प्रा.आशिष झाडके सर व शिवानी झाडके मँडम,यांचे मार्गदर्शन लाभले.पथनाट्यातील कलावंत-तनिष्का मगर,वेदीका तवले,श्रुष्टी फावडे,सार्थक वाघमारे, नंदिनी पोतदार,देवी मुंडे, वसुंधरा नांगरे,श्रध्दा मुंडे,शौर्या लोखंडे,ज्ञानेश्वरी यादव,संदेश पकवे,अथर्व डोईफोडे, सिद्धेश भवर, वरद तांबारे यांच्या भूमिका होत्या. सकाळपासून व्यसनमुक्तीचा संदेश देत पथनाट्य सादर करून बाल चिमुरड्यांनी कार्यक्रमात सर्वांची मने जिंकली. या चिमुकल्यांचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे जिल्हा पोलीस अधीक्षक   आर राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय कोलते, सहाय्यक जिल्हा आयुक्त  समाज कल्याण शशिकांत चिकुर्ते, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी एन बी चौगुले यांनी मुलाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या