आमदार बसवराज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीसाठी विधानसभेत मांडला प्रश्न:रिपोर्टर: जि.लातुर औसा तालुक्यातुन जाणाऱ्या रत्नागिरी ते नागपुर(वारंगा फाटा) या राष्ट्रीय महामार्गात प्रकल्प संचालकानी जमिनी संपादनावेळी नोंदनी मुद्रांक शुल्क विभाग यांचे कोष्टक १६ (अ) नुसार मावेजा देण्याचे कबुल केले,ठरल्यानुसार जमीन संपादन आणि मालमत्ता मुल्यांकनाचे काम शासन नियुक्त यंत्रणेमार्फत पुर्ण करुन जमिनी संपादनाची प्रक्रीया सुरु करणे,ते मान्य झाल्याने संबधीत शेतकऱ्यानी त्यांच्या जमिनी संपादित करु दिलेल्या आहेत ,ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या त्यांचा मावेजा देण्यासाठी उपविभागीय कार्यालयाने मावेजाचा आकडा / एकुन रक्कम शासनास कळविली व तो मंजुर होऊन २०० कोटी रुपये रक्कम रस्ते प्राधीकरणाने उप विभागीय कार्यालयास दिले,मावेजा आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित केलेल्या जमिनी व त्यावरील मालमत्ता यासह नोटीस देऊन मावेजाची रक्कम ही नमुद करण्यात येते,असे होऊन ही प्रत्यक्ष वाटपात दिरंगाई होते त्यासंबधीचे वृत्त वर्तमान पत्रात येताच, उप विभागीय कार्यालयाने काही मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली पण हे करत असताना शेतकऱ्यांच्या हायवेत जाणाऱ्या जमिनीच्या मावेजा पैकी फक्त २० टक्केच रक्कम जमा करण्यात आली ज्या वेळेस जमिन संपादित केली जे त्या जमिनीचे मुल्यांकन करुन रक्कम निश्चित करण्यात आली होती तो कोष्टकच वाटपावेळी बदलुन २९(ब) नुसार मावेजाच्या वाटण्याची भुमिका घेण्यात आली यात शेतरऱ्यांची सरळ सरळ फसवणुक झाली एक तर शेतकऱ्यांना फक्त २० टक्केच रक्कम जमा केली त्या वेळेस संपुर्ण रक्कम जमा न झाल्याने त्यांना व्याजाला मुकावे लागले आत्ता मावेजाचे कोष्टक बदलविणाऱ्या संबंधिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात यावा नोंदविण्याची संतप्त मागणी शेतकऱ्याकडुन मागणी करण्यात येत आहे तरी शासनाने या विषयी तातडीने कार्यवाही करावी व शेतकऱ्यांचा मावेजा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अशी मागणी आ.बसवराज पाटील यांनी सभागृहात केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या