पत्रकार राजाभाऊ वैद्य यांचा धनगर माझा पुरस्काराने होणार सन्मान: ९ जून रोजी पुण्यात सन्मान सोहळयाचे आयोजनअण्णासाहेब डांगे, राजाभाऊ वैद्य, डा.यशपाल भिंगे यांचा होणार सन्मान

रिपोर्टर: धनगर समाजातील कृतत्वान आणि समाजासाठी योगदान देणा—या व्यक्तीना धनगर माझा हा महत्वाचा पुरस्कार देण्यात येणार आहे.यामध्ये अण्णासाहेब डांगे, राजाभाऊ वैद्य, डा.यशपाल भिंगे यांचा सन्मान केला जाणार आहे.
धनगर माझा सन्मान सोहळा ९ जून रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता पुण्यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीजज ऑडिटोरियम, मॉडर्न इंजिनिअरींग कॉलेज जवळ शिवाजीनगर पुणे येथे होत असून अण्णासाहेब डांगे, साहित्य यशपाल भिंगे, आयएएस विक्रम वीरकर, पत्रकार राजाभाऊ वैद्य यांच्यासह १३ जणांचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती धनंजय तानले यांनी दिली.
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून खा.गिरीष बापट राहणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री राम शिंदे, ना.महादेव जानकार, आ. दत्ता भरणे, पुणे जि.प.अध्यक्ष विश्वासराव देवकते, आ.रामराव वडकुते, आ.नारायण पाटील, आ.अनिल गोटे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती मे अतिरिक्त आयकर आयुक्त डॉ.नितीन वाघमोडे, पुणे जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, महावितरण चे मुख्य महाव्यवस्थापक भरत जाडकर, जीएसटी पुणे विभाग चे उपायुक्त डॉ.राजेंद्र कु-हाडे, उपजिलाधिकारी डॉ.धनंजय सावरकर, साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, अमरजीत राजे बारगळ, भूषण राजे होळकर  गोपीचंद पडळकर, वखार महामंडळचे महाव्यवस्थापक शुभांगी माने आदी उपस्थित राहणार आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या