आमदार राहुल मोटे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मांडले शेतक—यांचे प्रश्न:


रिपोर्टर: शासनाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे भुम,वाशी तालुक्यातील शेतक—यांना सोयाबीनच्या विम्यापासुन वंचीत राहावे लागले आहे.आदिच दुष्काळामुळे आर्थिक आडचनीत आसलेल्या शेतक—यांना बॅंकांनी आणि महावितरण कंपनीने सहाकार्य करावे तसेच शासकीय दूध योजनेचा निधी वाढवून दयावा आशाप्रकारचे आनेक महत्वाचे प्रश्न आमदार मोटे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये पालकमंञ्याच्या निदर्शनास आणून दिले. 

 उस्मानाबाद येथे पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार राहुल मोटे यांनी भुम,परंडा,वाशी तालुक्यातील शेतक—यांच्या जिव्हाळयाच्या प्रश्नांची मांडनी केली.
भूम व वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पीक विम्यामधून वगळण्यात आले असून भूम व वाशी येथील शेतकऱ्यांना सोयाबीन च्या पिकाचा पीकविमा मिळावा तसेच  शासकीय दूध योजना भूम ची सध्याची जी संकलन क्षमता आहे ती जास्त वाढवण्यासाठी निधीची
 देण्यात यावा.राष्ट्रीयकृत बँकानी शेतकऱ्यांना मिळालेल्या विम्याचे पैसे त्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करून घेने थंबयवावे याविषयीचा प्रश्न आमदार मोटेंनी  बैठकीत मांडला असता पालकमंत्री यांनी ते विम्याचे पैसे शेतकऱ्यांना री एन्ट्री करून परत करण्याचे आदेश बँकांना दिले आहेत.तसेच महावितरण च्या माध्यमातून HVDS स्कीम खाली तसेच IPDS स्कीम खाली आत्तापर्यंत जिल्ह्यात शून्य टक्के कामे झाली आहेत ही बाब पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली.. यावर अधीक्षक अभियंता महावितरण यांनी कामे झालेली नसल्याची कबुली दिली.. त्याच बरोबर जिल्ह्यात नवीन डीपी ला मंजुरी दिली जात नसल्याचे सुद्धा पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.. यावर पालकमंत्री यांनी ऊर्जा मंत्री यांच्याकडे लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या