श्रीपतराव भोसले विद्यालयाचा निकाल आदर्श कलाशाखेत महाराष्ट्रात प्रथम तर विज्ञान शाखेचे चार एम,बी,बी,एस पात्रतेचे


रिपोर्टर: श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या निकालामध्ये उस्मानाबाद पॅटर्न दबदबा निमार्ण केला आसुन कला शाखेत महाराष्ट्रात प्रथम तर विज्ञान शाखेच्या माध्यमातुन चार विदयार्थी एम,बी,बी,एस पात्रतेसह उत्तीर्ण झाले आहेत.
श्रीपतराव भोसले हायस्कुलचा २०१८-१९ यावर्षीचा विज्ञान विभागाचा निकाल उल्लेखनीय लागलेला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८ मध्ये बोर्ड परीक्षेस एकूण ७३० विद्यार्थी बसले होते त्यापैकी ६९७ उत्तीर्ण झाले सरासरी निकाल ९५.४७%  लागला. कु. लोमटे प्रगती मनोहर ९०.९२% मार्क घेऊन जिल्हयात प्रथम , श्री उंबरे अमर युवराज ८५.२३% गुण घेऊन महाविद्यालयात व्दितीय तर कु. देशमुख अमृता नेताजी ८४.९२% गुण घेऊन महाविद्यालयात तृतीय आली एकुण ४१ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष म्हणजे NEET 2019 चा निकाल प्रथमच खुप चांगला लागलेला आहे यामध्ये सय्यद अमन मैनोद्दीन 562/720, , जाधव सयाजी प्रताप 542/720 नारायणकर विशाल गणपती 503/720 , कु सई भिमराव कांबळे 490/720 , कु मोहिते प्रियंका दिलीप 434/720 ,  निरफळ अर्थव अमोल 400/720, श्री उंबरे अमर युवराज 370/720 हे सर्व विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र आहेत यांना निश्चित पणे चांगल्या मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळू शकतो.
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या JEE MAIN परिक्षेमध्ये 6 विद्यार्थी JEE ADVANCE परिक्षेसाठी पात्र ठरले यामध्ये श्री मारवाडकर ऋषिकेश दिपक 94.78% जिल्हयात प्रथम , श्री पांचाळ गणेश रमाकांत 91.66 % व्दितीय , श्री देवकते अभिषेक तानाजी 89.15% तृतीय आले आहेत तसेच MHT-CET परीक्षेमध्ये PCM ग्रुपमध्ये पांचाळ गणेश रमाकांत 98.85 % जिल्हयात प्रथम श्री आदटराव विशाल भागवत 95.23% व्दितीय , श्री निरफळ अर्थव अमोल 94.80% तृतीय तर PCB ग्रुपमधून श्री जगताप सुमित गोंविदराव 98.90% जिल्हयात प्रथम, उंबरे अमर युवराज 98.10% कु. देशमुख अमृता नेताजी 95.47% तृतीय आलेले आहेत.
कार्यध्यक्ष  सुधिर आण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व प्राध्यापकाच्या परिश्रमातुन हे यश मिळाले आहे. सुधीर पाटील यांच्या  कल्पनेतुन साकारलेल्या PHOTON बॅचची निर्मिती या संस्थेने या वर्गास दिल्ली, कोटा , हैदराबाद येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक NEET, JEE अभ्यासक्रम घेण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. हे वर्ग सकाळी 7:30 ते 4:30 या वेळेत पूर्ण चालतात. विशेष बाब म्हणजे या वर्गातील कोणत्याही विद्यार्थ्यास खाजगी कोचिंग क्लास नाही. या वर्गातील विद्यार्थ्याची दर रविवारी NEET, JEE च्या धर्तीवर परीक्षा घेतली जाते त्याच्यांसाठी स्वतंत्र आभ्यासिका , ग्रथांलय उपलब्ध करुन दिली आहेत.
एकदंरीत सर्वाच्यां परिश्रमाचे , नियोजनाचे फलित म्हणजे हे यश आहे. यशस्वी विद्यार्थ्याची कार्यध्यक्ष  सुधिर आण्णा पाटील सरचिटणीस के.टी पाटील , प्राचार्य श्री पडवळ. एस.एस , उपप्राचार्य  देशमुख एस.एस प्रशासकीय अधिकारी आदित्य् पाटील उपप्रशासकीय अधिकारी घार्गे एस. के , हाजगुडे टी.पी व PHOTON बॅच प्रमुख भगत ए.व्ही व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या