
रिपोर्टर: ग्रामपंचायतेला आलेल्या निधीचा अपहार करणा—यां ग्रामसेवक व सरपंचा विरोधी गुन्हे नोंद करावेत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष महादेव गायकवाड यांच्या सह अन्य काही जनांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
वाशी तालुक्यातील सरमकुंडी ग्रामपंचायतीला आलेल्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांनी गौरव्यवहार केला आसल्याची माहीती महादेव गायकवाड यांनी जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातुन देवून सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.चौदाव्या वित्त आयोगायचा आलेला निधी कामासाठी न वापरता संगनमताने कागदोपत्री कामे दाखवून अपहार करण्यात आला आहे.त्यामुळे सरमकुंडी गावाचा विकास थंबला आसुन याला सरपंच आणि ग्रामसेवक जबाबदार आहेत.या दोघांवर लवकरात लवकर गुन्हे नोंद करावेत आणि अपहार झालेली रक्कम जोपर्यंत वसुल करण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील उपोषण कर्त्यांच्या या मागण्या आसुन आज उपोषणायचा दुसरा दिवस आहे.
0 टिप्पण्या