समाजाने साथ दिली म्हणून चौन्डीचे शिल्प उभे राहिले -अण्णासाहेब डांगे


पुणे /रिपोर्टर
महाराष्ट्र शासनाने चौंडी च्या विकास प्रकल्पासाठी 43 कोटी मंजूर केले असून पैकी 13 कोटी खर्च केले पण एकाही व्यक्तीने भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. या कामात समाजाने साथ दिली म्हणून चौन्डीचे शिल्प उभे राहिले असे प्रतिपादन अण्णासाहेब डांगे यांनी केले.
पुणे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 294 वी जयंती व  धनगर माझाच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या धनगर माझा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अण्णासाहेब डांगे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन  सन्मानित करण्यात आले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे अध्यक्ष रामचंद्र चोपडे, साहित्यिक डॉ. यशपाल भिंगे, जय मल्हार सेनेच्या प्रदेश सरचिटणीस रंजना बोरसे, महावितरनचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, युवा उद्योजक गणेश कोकरे, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे  गणेश करे पाटील, उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उर्फ राजाभाऊ वैद्य यांना समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच आय ए एस परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल विक्रम वीरकर व पुणे विभागाच्या लेखा व कोषागारे विभागाच्या सहसंचालिका शुभांगी माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आ. रामहरी रुपनवर, आ. रामराव वडकुते, मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे,महासंघाचे प्रवीण काकडे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, डीसीपी सुहास बावचे, अमरजीत राजे बारगळ, स्वागताध्यक्ष विवेक बिडगर, तुकाराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते. तर  उपजिल्हाधिकारी डॉ. धनंजय सावळकर, राज्यकर उपायुक्त डॉक्टर राजेंद्र कु-हाडे, डीवायएसपी रुक्मिणी गलांडे, महावितरणचे अधीक्षक ज्ञानदेव अभियंता पडळकर, अनिल राऊत, डॉ. उज्ज्वलाताई हाके  यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र गाडेकर, प्रतापराज मासाळ,  सुनील बनसोडे, वृषाली मतकर यांच्यासह पुण्यश्लोक फौंडेशनच्या सर्व सभासदांनी प्रयत्न केले.
यावेळी कृष्णा खांडेकर या युवकाने योगा व प्राणायाम याची चित्तथरारक प्रात्याक्षिके सदर केली. तर मुंबईच्या ऋणानुबंधग्रुपने समाज प्रबोधन गीतांचा सांस्कृतिक कार्यकम सादर केला. आभार गणेश खामागळ यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या