वाशी तालुक्यातील रूईची स्नेहा कवडे शिष्यवृत्ती परिक्षेत महाराष्ट्रात पाचवी:
 रिपोर्टर: वाशी तालुक्यातील रूई येथिल स्नेहा कवडे हीने  5 वी शिष्यवृत्ती परिक्षेत  महाराष्ट्रात पाचवी 5 वी तर मराठवाडयात २ री येण्याचा मान मिळवला आ​हे. त्याच बरोबर उस्मनाबाद जिल्हयात प्रथम क्रमांक मिळवुन गावाचे व जि. प. प्राथमिक शाळा पारगाव तसेच वाशी तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.या बददल स्नेहाचे व तिच्या पालकाचे अभिनंदन भाजपा तालूका अध्यक्ष सचिन इंगोले, रुईचे उप सरपंच पांडुरंग उंद्रे, मोहन सुबुगडे,  दत्तात्रय घुले यांच्या वतीने करण्यात आले.स्नेहाने मिळवलेल्या क्रमांका मुळे गाव परिसरामध्ये तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या