श्रमदानातूनच गाव समृद्ध बनेल - आमदार मधुकरराव चव्हाण
संपर्क संस्था मुबंई अंतर्गत आमदार संवाद मंचचा लोकोपयोगी उपक्रम

रिपोर्टर: -तुळजापूर तालुक्यातील  बसवंतवाडी या गावातील नागरिक आज श्रमदानासाठी पेटून उठले आहेत,मागील अनेक वर्षांपासून अनियमित पडणाऱ्या पावसामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत आहे,त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे,गावात मोठया प्रमाणात जलसंधारनाची कामे झाली पाहिजे,मातीनाला,बांधबंधिस्ती, डोंगरावर समतल चर खुदाई, नाला सरळीकरण, वृक्षारोपण,बांधावर वृक्षांची लागवड असे कामे केली पाहिजे तरच तुमचा गाव पाणीदार व समृद्ध बनेल असे मत आमदार मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

यावेळी सोबत पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड,आमदार संवाद मंचचे अध्यक्ष डॉ. सतिश महामुनी, तरुण भारत चे जेष्ठ पत्रकार अंबादास पोफळे,पत्रकार संजय गायकवाड, संपर्क संस्थेचे जिल्हा समन्वयक अनिल आगलावे,प्रा.डॉ.अविनाश ताटे,ग्रामसेवक गोपाळ कडदोरे,उपसरपंच बप्पा भोसले, विकास भालेकर,आदी उपस्थित होते,

बसवंतवाडी येथे दिनांक 24 मे 2019 पासून अखंडित 300 ते 350 गावकरी यांच्या सह सर्व पत्रकार बांधव व आमदार संवाद मंच चे पदाधिकारी श्रमदान करीत आहेत,आज तुळजापुर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन श्रमदान करीत सर्व ग्रामस्थांना सपोर्ट केला,तसेच त्यांच्या गावस्तरावरील समस्या जाणून घेतल्या,संबंधित अधिकारी यांना मोबाईल द्वारा संपर्क साधला त्यावरील उपाययोजना करण्यासाठी सूचना केल्या.आमदार चव्हाण यांनी  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनाही फ़ोन करून सुरू असलेल्या श्रमदान कामाबाबत माहिती दिली व या गावाला येऊन भेट द्या तसेच गावाला समृद्ध बनवण्यासाठी प्रशासनाची मदत व्हावी असेही म्हणाले.

ग्रामस्थांनी  12  दिवसात जवळपास 1450 cct समतल चर खंदुन पूर्ण करण्यात आल्याचे काम पाहून आमदार चव्हाण साहेबांनी ग्रामस्थांचे कौतुक केले व श्रमदानातूनच गाव समृद्ध होते यासाठी गावाची एकी व कामात सातत्य असावं अशाही सूचना केल्या, अन लागेल ती मदत करण्याचा आशावाद व्यक्त केला.आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी यांना या गावास भेट देऊन शासकीय मदत करण्यासाठी सूचित केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या