दहावीचा निकाल जाहीर परंतु टक्केवारी घसरली!

रिपोर्टर: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे परंतु यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आसुन गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी निकाल लागल्याचे दिसत आहे.
 मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.31 टक्क्यांनी निकाल कमी लागला असून गेल्या 5 वर्षांमधील यंदा दहावीचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. याआधी 2007 मध्ये 78 टक्के निकाल लागला होता.
यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 10.64 टक्क्यांनी जास्त आहे.तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के लागला आहे.यावर्षीही मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र दिसत आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी 10 जूनपासून अर्ज करता येईल.
परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या किंवा श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षेची संधी मिळणार आहे.

 विभागवार टक्केवारी 
 पुणे : 82. 48 I नागपूर : 67.27 I औरंगाबाद : 72.20 I मुंबई : 77.04 I कोल्हापूर : 86.58 I अमरावती : 71.98  I नाशिक : 77.58 I लातूर : 72.87 I कोकण : 88.38

 दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल.

 निकालासाठी संकेतस्थळे : 

▪ mahresult.nic.in
▪ maharashtraeducation.com
▪ hscresult.mkcl.org

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या