पक्ष संघटना व बुथ कमिटया मजबुत करा - आ. चव्हाणरिपोर्टर:उस्मानाबाद तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत बोलताना झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचुन न जाता गाव स्थरावरील तयार केलेल्या बुथ कमिट्या लागावे असे आवाहन केले.
या बैठकीस जि. काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रशांत चेडे, अध्यक्ष विश्वास शिंदे, संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, जिल्हाध्यक्ष सय्यद खलील, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, युवक जि. उपाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, वकील सेल जि. अध्यक्ष अ‍ॅड. विश्वजती शिंदे, जेष्ठ नेते, छोटुमियाँ काझी, व्यंकटराव मरगणे, सुभाष हिंगमीरे,बाबुराव नाईकवाडी, बाळासाहेब कावळे, चंद्रकांत माळी, विजय पाटील, व्यंकट जाधव, खंडेराव गाढवे, अशोक मगर, अकबर शेख, विनोद लांडगे, आयुब मुलाणी, आनंद दळवी, रणजीत पाटील, गुणवंत पवार, नासेर शेख, अमर माने, राहुल कोरे, श्रीमंत तेरकर, भारत काटे, राजु नळेगावकर, शिवाजी चौगुले, सुरेश ढोबळे, डॉ. तोडकर, सुधीर गव्हाणे, अमोल पाटील, राजकुमार बचाटे, विशाल जावळे, कल्पना मगर, लैलाबी शेख, अशोक गडकर, शिराज शेख, बालाजी माने, नंदु चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच तयारीला लागावे असे सुतोवाच केले.
यावेळी बोलताना, जिल्हाध्यक्ष चेडे, यांनी पक्षसंघटनेत काम करणार्‍या कार्यकर्त्यांलाच पदे दिले जातील त्यामुळे पक्ष संघटना वाढविण्यासाठी सक्रिय असणार्‍यांनी तालुकाध्यक्ष यांचेकडे स्वत:चे माहिती पत्रक दि.10 जून 2019 पर्यत द्यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे यांनी केले. सुत्रसंचलन सुभाष हिंगमिरे यांनी तर आभार रोहित पडवळ यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या