मालिका, चित्रपटांना भाषेची सक्ती!

रिपोर्टर: टीव्हीवरील मालिका आणि चित्रपटांच्या सुरुवातीला व शेवटी येणारी श्रेय नामावली आता इंग्रजीबरोबरच त्या-त्या राज्यांच्या स्थानिक भाषेतही दाखवावी आसे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहेत.

 हिंदी किंवा अन्य प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणाऱ्या मालिकांची शीर्षके, कलाकारांची नावे इत्यादी तपशील फक्त इंग्रजी भाषेतूनच दाखवला जातो. या प्रकारामुळे केवळ प्रादेशिक भाषाच येत असलेल्या अनेकांना मालिकेसंबंधीची माहिती लक्षात येत नाही. हि अडचण लक्षात घेऊन स्थानिक भाषांना प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान, जर मालिकेच्या निर्मात्यांना मालिकेचे नाव आणि इतर गोष्टीही स्थानिक भाषेत द्यायच्या असतील तर ते देऊ शकतात. त्यासंदर्भात कोणतेही बंधन नाही

सध्या हा निर्णय केवळ मालिकांबद्दल घेतला गेला असून लवकरच चित्रपटांसाठीही घेतला जाणार आहे. आशी माहीती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या कडुन देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या