श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये दहावीच्या गुणवंत विदयर्थ्यांचा सत्कार:
रिपोर्टर: नुकत्याच दहावीच्या लागलेल्या निकालात भोसले हायस्कुल मधुन विशेष प्राविण्यांने पास झालेल्या विदयार्थ्यांचा आणि पलक व गुरूजनांचा सत्कार करण्यात आला.
उस्मानाबाद येथिल श्रीपतराव भोसले हायस्कूल मधुन इयत्ता दहावी मध्ये  90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण  होणार्‍या विद्यार्थ्यांचा,पालकांचा व त्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाहक प्रमोदजी बाकलीकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य श्री. पडवळ एस .एस. यांनी केले . संस्थेचे अध्यक्ष  सुधीर अण्णा पाटील यांनी यशवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पुढील वाटचालीस संस्थेच्यावतीने शुभेच्छा दिल्या. लातूर पेक्षा सुद्धा भोसले हायस्कूल विज्ञान विभागांमध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा देत असून दिल्ली व राजस्थान (कोटा ) येथील तज्ञ प्राध्यापकांची टीम अकरावी बारावी सायन्स विभागासाठी आणलेली आहे. या वर्षी NEETव JEE मध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे तरी लातूरला यशस्वीतांचे प्रमाण कमी असल्यामुळे आपण एकत्रित रित्या उस्मानाबाद पॅटर्न तयार करू यासाठी आपण इथेच ॲडमीशन घेऊन शहराच्या लौकिकात भर टाकावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सु​धीर पाटील यांनी केले. अध्यक्षीय समारोपात प्रमोद बाकलीकर यांनी पुस्तकी ज्ञान व गुणवत्ते सोबतच व्यवहारिक ज्ञानात सुद्धा कुशल असले पाहिजे असे सांगितले.महाराष्ट्रामध्ये अव्वल असलेल्या भोसले हायस्कूलचे कौतुक करून बाकलीकर यांनी अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.याप्रसंगी तुळजापूरचे कृषिनिष्ठ शेतकरी सत्यवान भाऊ सुरवसे संस्थेचे संचालक गाडे सर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी.आदित्य पाटील,युवा नेते अभिराम भैय्या पाटील,प्रशासकीय अधिकारी..संतोष घार्गे,पर्यवेक्षक इंगळे वाय.के.सुरवसे एं.व्ही. हाजगुडे एन.एन अण्णा ई टेक्नो चे प्राचार्य आर. बी .जाधव, ननवरे सर, गुंड मॅडम हे उपस्थित होते सूत्रसंचालन एस सी पाटील व के .पी. पाटील यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या