एटीएमध्ये कॅश नसेल तर बॅंकेला होणार दंड

 तीन तासांपेक्षा जास्त काळ एटीएम कॅशलेस न ठेवण्याचे आरबीआयचे 
 बँकांना निर्देश

 रिपोर्टर: बहुतांश वेळा एटीएम मध्ये कॅश नसल्याची समस्या आपल्याला भेडसावते. परंतु यापुढे 3 तासाहून अधिक काळ एटीएम कॅशलेस राहिल्यास संबंधित बँकांना दंड ठोठविला जाणार आहे, असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहे.
छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएममध्ये कित्येक दिवस कॅश उपलब्ध नसते.छोट्यात छोटी रक्कम काढण्यासाठी नागरिकांना बॅंकांच्या रांगेत उभे राहावे लागते.
 एटीएम मध्ये असलेल्या सेंसरच्या माध्यमातून एटीएममधील कॅशच्या ट्रेमध्ये किती कॅश आहे हे बँकांना कळते. एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसेल तरी काही वेळा बँका याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या