ईटकूर जिप प्रशालेतील विदयार्थी रोहन शिंदेला शिष्यवृत्ती परिक्षेत यश:

मागासवर्गीया मध्ये जिल्हयात प्रथम समाज बांधवा कडुन अभिनंदन 


रिपोर्टर: - कळंब तालुक्यातील ईटकूर जिल्हा परिषद प्रशाले अंतर्गत सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये इयत्ता ८वी वर्गातुन शिक्षण घेतलेला रोहन लक्ष्मण शिंदे हा अनुसुचित जाती संवर्गामधून प्रथम आला असुन तो शिष्यवृत्ती धारक ठरला आहे . याच शाळेतील ओंकार संजय कुंभार , सत्यजित नितीन आडसुळ हेही गुणानुक्रमे शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत .
या यशस्वी विद्यार्थ्यांना जि .प . प्रशालेचे मुख्याध्यापक एस .आर . वाघमारे यांच्या सुचनानुसार सहशिक्षक, क्षिरसागर , कोकाटे, शिंदे , पखाले , श्रीमती कवडे , श्रीमती काझी , साबळे यांचे मार्गदर्शन लाभले . प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदण केले .
तर अनुसुचित जाती संवर्गामधुन जिल्ह्यात सर्व प्रथम आलेल्या रोहन लक्ष्मण शिंदे याचा येथील भिमनगर येथे समाज बांधवाच्या वतीने ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक पाचच्या सदस्य श्रीमती अनिता राहुल रणदिवे यांच्या हस्ते, शाल , फेटा ,हार घालुन पेढा भरवुन मोठा सत्कार केला .व त्यास पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी
  रोहनचे  वडील, देशभक्तचे संपादक लक्ष्मण शिंदे, आई , देशभक्त शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष मंजुषा लक्ष्मण शिंदे तसेच कोचिंग क्लासचे देसाई सर यांचाही यावेळी समाज बांधवाकडुन सन्मान करण्यात आला व या त्याच्या यशामुळे जिप प्रशालेच्या सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदनही यावेळी करण्यात आले .
या कार्यक्रमास माजी ग्राप सदस्य राहुल रणदिवे,युवराज शिंदे , मिलींद रणदिवे, पांडुरंग शिंदे , युवराज रणदिवे, शिवहारी सिरसट , बाळराजे सोनवणे , अक्षय शिंदे , रोहित ओव्हाळ, ग्रापसदस्य अनिता रणदिवे, आशाबाई शिंदे , मालनताई रणदिवे , अनिता शिंदे , हिराबाई सिरसट , गंगाताई शिंदे , सुरेखा शिंदे , श्रीमती शारदाबाई शिंदे, छाया शिंदे , यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुरूषोत्तम शिंदे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेष सिरसट, लखन रणदिवे , सोहेल लगाडे , सारिपुत्र शिंदे , रोहित रणदिवे , विश्वजित शिंदे , रोहित शिंदे यांनी मोठे परिश्रम घेतले शेवटी आभार अक्षय शिंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या