सुरेश पाटील यांच्या कार्यक्रमाकडे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फिरवली पाट: वेळेचे कारण देत डावलला कार्यक्रम: चर्चा मात्र वेगळीचरिपोर्टर: दुष्काळी परिस्थितीचे भान न ठेवता आफाट खर्च करूण आयोजीत केलेला कळंब येथिल भाजपा तालुका कार्यालयाच्या उदघाटनाचा कार्यक्रम महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वेळेचे कारण पुढे करत दुडकावून लावला.त्यामूळे बासींग बाधुन विधानसभेची तयारी करत  आसलेले सुरेश पाटील यांचे येणा—या निवडणूकीत काय होणार याची चार्चा सगळीकडे सुरू आहे.

देश भरात मोदी लाट निर्माण झाल्यामुळे पावसाळयात उगवणा—या छञ्या प्रमाणे ठिकठिकाणी विधानसभेचे उमेदवार उगवताना दिसत आहेत.कुठलीही राजकीय,सामाजीक कारकीर्द नसताना आमदार होण्याची स्वप्न पहाणा—यांची संख्या झपाटयाने वाढत आहे.त्यापैकीच कसबे तडवळा येथिल सुरेश पाटील हे एक आहेत. सगळीकडे मानसं पाण्यासाठी जनावरे चारा पाण्यासाठी दुष्काळा बरोबर संघर्ष करत आसताना कुठल्याही सामाजीक बांधीलकीचे भान न ठेवता साखर कारखाण्याच्या माध्यमातुन विविध मार्गाने कमवलेले पैसे खर्च करूण तालुका कार्यालयाचे उदघाटन ठेवण्यात आले होते.तालुक्यात संगळीकडे मोठे मोठे बॉनर दैनिकाला पान पान जाहीरती, कार्यकर्तै, गाडया, आशा माध्यमातुन पैशाची उधळन करूण कार्यक्रमाचे आयोजन केल परंतु महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उस्मानाबाद जिल्हयातील तिव्र दुष्काळी वातावरणाची जान आसल्याने या कार्यक्रमाकडे त्यांनी पाट फिरवली.कार्यक्रमाला येण्यासाठी आयोजकांनी सतरा वेळेस विनवण्या करूण ही चंद्रकात पाटील यांनी मी या कार्यक्रमाला येवू शकत नाही असे म्हणून झिडकारूण लावले. 

मतदार संघ शिवसेनेचा सुरेश पाटील यांची तयारी कशासाठी

उस्मानाबाद,कळंब मतदारसंघ हा मुळातच शिवसेनेचा आसताना सुरेश पाटील यांनी विधानसभेची तयारी कोणत्या बेस वर सुरू केली आहे.ही चर्चा काही कार्यकर्त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्याच्या लक्षात आणून दिल्यामुळे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील या कार्यक्रमाला आले नाहीत आशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे. तिकीट नाही मीळाले तर मी अपक्ष लढणार आहे आशी माहीती काही दिवसापुर्वी सुरेश पाटील यांनी तडवळा येथिल स्थानिक लोकांशी आणि माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलून दाखवली होती. हीच माहीती भाजपाच्या वरिष्ठाकडे पोहचल्याची चार्चा होत आहे.त्यामुळे येणा—या विधानसभेला सुरेश पाटील हे कोणत्या पक्षाचे उमेदवार आसतील या बददल लोकांच्या मनात शंका आहे.

उमेदवारी मिळण्यासाठी सुरेश पाटील यांचे योगदान काय!

एस,पी,शुगर हा एक साखर कारखाना वर्षातुन दोन तिन महीने मनमनी प्रमाणे चालवून उदयोजक आसल्याचा दावा करणे.इतर साखर कारखाण्यापेक्षा कमी भाव देवून शेतक—यांची लुट करणे,उस्मानाबाद परिसरातील शेतक—यांना कमी भाव देणे,आपल्या परिसरातील उस न घेता माजलगाव व इतर बाहेर जिल्हयातील उस मागवणे,कुठलीही सामाजिक बांधीलकी न जपता गावपातळीवर आत्महात्याग्रस्थ शेतक—यांचे राजकारण करणे.आत्महात्याग्रस्थ शेतक—यांच्या श्रध्दांजलीचे फलक हाटवण्यासाठी आंदोलन करणे,आशा प्रकारच्या आनेक कारणासाठी प्रसिध्द आसलेले सुरेश पाटील यांना विधान सभेची उमेदवारी कशी मीळणार हे विचार करण्यासारखे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या