शाळेच्या पहील्या दिवशी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा


  रिपोर्टर: तब्बल दीड महिने निर्जीवावस्थेत असणाऱ्या शाळा आज बालचमूंच्या किलबिलाटाने जिवंत झाल्या.उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटलेल्या बालकांना शेवटी-शेवटी ओढ लागते ती आपल्या जुन्या वर्गमित्रांची,शिक्षकांची व शालेय परिसराची!शाळेच्या निष्प्राण भिंतीही जणू बालकांच्या श्वासाने सचेतन झाल्याचा आभास आज शाळेच्या आरंभदिनी प्रत्येक शाळेत दिसून येतो.याला तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी शाळासुद्धा कशी अपवाद असेल बरं!
     जि.प.प्राथमिक शाळा पांगरदरवाडी येथे आज शाळेचा आरंभदिन शाळा प्रवेशोत्सव म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.सर्वप्रथम सकाळी लवकरच गावातून प्रभातफेरी काढत विविध शालेय घोषणा देत विद्यार्थ्यांनी नवागत विद्यार्थ्यांनाही यामध्ये सामील करुन घेतले.यानंतर शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे स्वागत,इ.1 ली ते 8 वी.पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण,विद्यार्थ्यांचे वाढदिवस इ.उपक्रम घेण्यात आले.तसेच बदलीने शाळेवर आलेले नवीन  शिक्षक श्री.मर्डे सर व कोळी सर यांचेही मान्यवर व शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यमान उपसरपंच.बालाजी शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून सैपन शेख,संभाजी मते,श्रीमती.भाग्यश्री कदम यांचेसह मु.अ.उत्रेश्वर पैकेकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक .शांताराम कुंभार यांनी तर आभारप्रदर्शन राजेश धोंगडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी .हर्षवर्धन माळी,अनिल हंगरकर,मिनाक्षी मगर,कोरबू ,शहाजी कोळी व मर्डे यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या