विरोधी पक्षाचा विधानभवनाच्या बाहेर ठीया आंदोलन पहील्याच दिवशी विरोधी पक्ष आक्रमक:विधिमंडळ मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील यांची ही यावेळी उपस्थीती

रिपोर्टर: राज्यात दुष्काळाची भीषणता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणी व पुर्वमशागतीसाठी हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी,शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे. रोजगार निर्माण करण्यात सरकारला अपयश आल्याने बेरोजगार तरुणांना भत्ता दिला पाहिजे,  अशी मागणीही करण्यात आली राज्यात उद्योगाची बिकट परिस्तिथी आहे.“गिफ्ट” सिटी, डायमंड मार्केट,कपडा मार्केट सारखे उद्योग आणि व्यापार गुजरात राज्यात गेले. राज्यात उद्योगवाढीचाही केवळ आभास निर्माण केला जात आहे.गेल्या निवडणुकीपुर्वी धनगर आरक्षणाचा आभास निर्माण केला,आज पाच वर्ष झाली तरी आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षणाचा गुंता कायम आहे. मुस्लीम व इतर आरक्षणांचे प्रश्न कायम आहेत ही जनतेची फसवणुक आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे,सरकारवर सातत्याने न्यायालय ताशेरे ओढत असुन ही सरकार आणि मुख्यमंत्र्यासाठी लज्जास्पद गोष्ट आहे,असे विरोधी पक्षाच्या नेत्यानी म्हटले
यावेळी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान,आमदार जयंतराव पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, विधिमंडळ मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख,विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील,आ.मधुकरराव चव्हाण,आ.अमित देशमुख,सपाचे नेते आमदार अबु आझमी,आदि नेते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या