जुळयांना पडले शेम टु शेम मार्क: सगळीकडे होतय कौतूक

रिपोर्टर: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दोन जुळ्या भावांना तर ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यातील दोन जुळ्या बहिणींना दहावीच्या परिक्षेत सेम-टू-सेम मार्क मिळालेत… या योगायोगा मुळे दैवी शक्ती काय आसते आशा प्रकारच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील वळई गावच्या योगेश व शैलेश काळेल या जुळ्या बंधूंच्या बाबतीत हा चमत्कार झालाय. हे दोघेही खरंतर वेग-वेगळ्या शाळेत शिकतात. पण यांना दहावीच्या परिक्षेत मिळालेली मार्कांची टक्केवारी मात्र सेम-टू-सेम आहे.  योगेश व शैलेश काळेल या जोडगोळीने परिक्षेत ७७.४० टक्के गुण मिळवून दहावीत यश मिळवलंय. तर ठाणे जिल्ह्यातील अंबेशिव भिनारपाडा गावातील रिद्धी व्यापारी आणि सिद्दी व्यापारी या दोन जुळ्या बहिणींनादेखील १० वीत सेम-टू-सेम टक्केवारी मिळालीय. या दोघींना दहावीला ८४ टक्के मार्क मिळालेत. इतकच काय तर हिंदी आणि इंग्लिश या विषयात देखील दोघींना सारखेच गुण आहेत.

आर्थिक परिस्थिती नाजूक असताना  देखील गाव खेड्यातील या जुळ्या बहिणींच्या १० वीतील यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अंबेशीवमधील सानेगुरुजी शाळेत या बहिणी दुसऱ्या आल्या आहेत. लहानपणापासून दोघींच्या आवडी निवडी या बहुतांश सारख्या आहेत. विशेष  म्हणजे एकाच पुस्तकावर दोघींनी १० वीचा अभ्यास केलाय. आता भविष्यात देखील त्या वाणिज्य शाखेत प्रवेश घेणार असून एकाच पुस्तकावर शिकून बॅंकेत नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करणार आहेत.

योगेश व शैलेश यांची देखील अशीच परिस्थिती असून एवढंच काय, या दोघांच्या आयुष्यातील ध्येय सुद्धा सेम च आहे. या दोघांनाही कुठल्याही ऑफिस मधील खुर्चीवर बसून ऑफिसर व्हायचं नाही, तर यांना सैन्यात भरती होऊन देशाच्या सेवेसाठी सीमेवर लढायचं आहे.

वळई येथील शेतकरी असलेल्या उमेश व जंता काळेल यांच्या पोटी या दोघांचा जन्म झालाय.  सोळा वर्षीय या जुळ्या भावांमध्ये एका तासाचही अंतर नाही, शैलेश हा श्री जनुबाई विद्यालय विरळी येथे सेमी माध्यमातून शिकत होता. तर योगेश हा श्री सर्वलिंग विद्यालय, वळई येथे मराठी माध्यमातुन शिकत होता. जन्मतःच जुळे असणारे शैलेश व योगेश पाहिली पासून वळई येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत होते. पहिली पासून शाळेतील गुरुजींना पण दोघांतील फरक समजत नव्हता, म्हणून सहावी पासून शैलेश याला विरळी हास्कुल मध्ये घालण्यात आले होते. या जुळयांच्या पराक्रमामुळे महाराष्ट्रात सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या