ई चलन सॅप्टवेअरच्या माध्यमातुन पोलीसांनी केली दोन वर्षामागील दंड वसुली:वन स्टेट वन चलन प्रणालीचा वापर: रिपोर्टर: तुम्ही राज्यामध्ये कुठेही वहातुक नियमाचे उल्लंघन केले आसता त्याचा होणारा दंड महाराष्ट्रात कोणत्याही ठिकानी ई चलन मशिन च्या माध्यमातुन तुम्हच्याकडुन वसूल होवू शकतो.पोलीस विभागाने वन स्टेट वन चलन या प्रणालीचा वापर सुरू केल्यामुळे उस्मानाबाद येथे एका वहानाला दोन वर्षापुर्वी मुंबई येथे करण्यात आलेला दंड उस्मानाबाद मध्ये वसुल करण्यात आला.

उस्मानाबाद मध्ये बस स्थानका समोर वहातुक नियमाचे उल्लंघन करण्या—या वहानावर कार्यवाही करत आसताना ट्रॉफीक पोलीस प्रकाश चाफेकर व माने यांना MH01 BR 0484 ही गाडी नियमाचे उल्लंघन करताना त्यांच्या निदर्शनास आली.ई चलन सॅप्टवेअरच्या माध्यमातुन पावती करत आसताना सदर गाडीवरती मुंबई आणि पुण्यामध्ये 2017 व 2018 साली नो पार्गीग मुळे झालेला 2,300 रू दंड पेंडीग मध्ये आसल्याचा निदर्शनास आला.त्यामुळे सदर वहान चालकाला तो पुर्ण दंड भरावा लागला.या ई चलन प्रनालीमुळे होणा—या दंडापासुन कोनीही वाचू शकणार नाही.हा संदेश या दंड वसूलीमुळे सगळीकडे पोहचला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या