मलकापुर येथे महाराणा प्रताप जयंती निमीत्त गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार:रिपोर्टर:अनंत पाटीलउदगीर तालुक्यातील मलकापुर येथे महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने गावातील 10 वी मध्ये चांगले गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या विदयार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन  सत्कार करण्यात आला. आदत्य हनुमत पवार याने 96% गुण घेऊन शाळेतून पहीला क्रमाक पटकवला तसेच कु वैष्णवी वीरभद्र बिरादार हीने 94% गुन घेऊन समाजात मलकापुर गावचे नाव लैकिक केले.यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. तसेच महाराणा प्रताप जयंती निमित्त गावातून महाराणा प्रताप याच्या प्रतीमेची ढोल ,ताशा ,   लेझीम च्या गजरात मिरवणूक काढली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलु पवार,कालुसिंग पवार,राहुल पाटील,शातिवीर बिरादार, सचिन पवार,आनिल पवार ,सुनिल पवार,व गावातील सर्व तरूण बाधवानी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचल अनंत पाटील यानी केले तर आभार दिनेश पाटील यानी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या