जिल्हा दुष्काळ मुक्त होण्यासाठी जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांचे श्री महालक्ष्मीला साकडे:

रिपोर्टर: उमरागा तालुक्यातील कंटेकूर येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेवून उस्मानाबाद जि.प.विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी जिल्हा दुष्काळ मुक्त होण्यासाठी महालक्ष्मीला साकडे घातले.

उमरगा येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रे निमित्त जि.प.विरोधी पक्ष नेते शरण बसवराज पाटील यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.कंटेकूर येथिल ग्रामदैवत महालक्ष्मीची दरवर्षी यात्रा भरते या यात्रेला तालुक्यासह परिसरातील लोक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.या यात्रेच्या निमीत्ताने जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेते शरण पाटील यांनी कंटेकूर येथे जावून श्री महालक्ष्मी चे दर्शन घेतले.यावेळी गावक—यांनी पाटील यांचा सत्कार केला.सत्कारंच्या वेळी सरपंच गोविंद पाटील,उपसरपंच,महेश सातलगे,श्रीहरी शिंदे-पाटील आण्णाराव सातलगे,भाऊ कुलकर्णी,राम बळगानवरे,नवनाथ जमादार यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या