उस्मानाबाद जिल्हा विभागातील महिला पोलीस उपनिरीक्षक इमारती वरुन पडल्या प्रकरणी चौकशीरिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हा पोलीस विभागातील पोलीस स्टेशन उस्मानाबाद (शहर) येथील महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा रामदत्त गिरी वय 29 वर्षे, रा. निर्मला अपार्टमेंट श्रीकृष्ण नगर उस्मानाबाद येथे राहत असुन त्या दिनांक 31.05.2019 रोजी सकाळी 06.00 वा. चे सुमारास अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरुन पडल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत, त्यांना उपचारासाठी पल्स हॉस्पीटल, उस्मानाबाद येथे दाखल केले असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सोलापुर येथे रेफर करण्यात आले असुन त्यांचेवर सोलापुर येथे उपचार चालु आहेत.

            या प्रकरणी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ.रविंद्र कुमार सिंगल व जिल्हा पोलीस अधीक्षक  आर. राजा, उस्मानाबाद यांनी घटनास्थळी भेट दिली असुन या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्दे हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या