विधानभवना समोर विरोधकाचा ठीया:सरकार विरोधात घोषनाबाजी
विधिमंडळ मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील यांची ही उपस्थीती


रिपोर्टर: मागील वर्षीच्या दुष्काळामुळे राज्यातील पीक उत्पादनात आठ टक्के घट झाली असल्याची चिंताजनक बाब राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्रात 2.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. गेल्या वर्षी कृषी आणि संलग्न कार्य क्षेत्राचा वृद्धीदर 3.1 टक्के होता, यावर्षी तो कमी होऊन 0.4 टक्क्यांवर येईल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे राज्याच्या उद्योग क्षेत्रातही 0.7 टक्क्यांची घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्या वर्षीच्या 8.1 टक्क्यांवरुन 9.2 टक्के वाढणे अपेक्षित आहे. म्हणजेच त्यात 1.1 टक्क्यांची अल्पशी वाढ दिसून येत आहे. राज्याच्या दरडोई उत्पादनात यंदा कोणतीही वाढ झालेली नसून दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगणा राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे ह्या सर्व मुद्यावर दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचे आमदार आक्रम आहेत

यावेळी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान,आमदार जयंतराव पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, विधिमंडळ मुख्य प्रतोद आ.बसवराज पाटील शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख,विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील,माजी मंत्री आ.मधुकरराव चव्हाण,माजी मंत्री अमित देशमुख,आ.विक्रम काळे,आ.सतिष चव्हाण,आ.राहुल मोठे,आ.भारत भालके,आदिची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या