खासगी वाहनांवर 'पोलीस' लिहिण्यास मनाई :न्यायालयाचा निर्णय: येत्या 7 दिवसात वाहनांवर कारवाई करावी लागणाररिपोर्टर: खासगी वाहनांवर पोलीस नाव अथवा लोगोचा वापर करून काही जणांकडून नियमांची पायमल्ली केली जाते. असे प्रकार रोखण्यासाठी हायकोर्टाने पोलीसा सह न्यायाधिशांना सुध्दा खाजगी गाडीवर पोलीस
अ​थवा न्यायाधीश असे लिहिता येणार नाही आसा निर्णयमुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.

पोलिसांना आपल्या खासगी वाहनांवर 'पोलीस' असं लिहिलंले किंवा पोलिसांचा लोगो काढून टाकावा लागणार आहे. तसेच न्यायाधीशांनाही आपल्या खासगी वाहनांवर 'न्यायाधीश' असं लिहिता येणार नाही.कारण खाजगी वाहनांवर 'पोलीस' किंवा 'न्यायाधीश' लिहिलेलं आढळलं तर महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 2013 च्या कलम 134 प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.
हायकोर्टाच्या आदेशानंतर वाहतूक पोलिसांना येत्या 7 दिवसात वाहनांवर कारवाई करावी लागणार आहे.
या कारवाईचा अहवाल वाहतूक मुख्यालयाला सादर करावा लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या