गुटख्याची वाहतुक करणाऱ्या ट्रकसह 46 लाखांचा माल जप्त:नळदुर्ग पोलीसांची कामगीरी
   रिपोर्टर: तुळजापूर नळदुर्ग रोडवर एका ट्रकमध्ये गुटका आसल्याची गुप्त माहीती पोलीसांना मिळताच पोलीसांनी त्या ठीकानी जावून थांबलेल्या ट्रकची तपासनी केली आसता त्यामध्ये 36,10,800 रूपये किमतीचा गुटका आढळून आला.सदरची गाडी ही कर्नाटक बसवकल्यान या ठिकानची आसुन गाडीच्या चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आसुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.
 
 दिनांक 16.06.2019 रोजी नळदुर्ग पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्याने नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या पथकाने मिळालेल्या माहिती प्रमाणे तुळजापूर नळदुर्ग रोडवरील रुद्रा हॉटेलसमोर ट्रक क्र. एम.एच. 43 यु. 1628 ही ट्रक थांबलेली दिसली. सदर ट्रकची पोलीसांनी बारकाईने पाहणी केली असता ट्रकमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला 36,10,800/-रु चा गुटखा व ट्रकची किमंत 10,00,000/-रु. असा एकुण 46,10,800/-रु. चा माल मिळुन आला.
 गाडीमधील कागदपत्राची पाहणी केली असता गाडीमधुन मालक नामे शेख जीलानी शेख रब्बानी रा.शाह नगर बस्वकल्याण कर्नाटक यांचे लायसन व गाडीचे कागदपत्र मिळुन आले आहेत. त्यानंर सदर ट्रकचा चालक जगन्नाथ उर्फ संभाजी शिवाजी गायकवाड रा. भुयार चिंचोली ता.उमरगा यास आज दिनांक 17.06.2019  रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. सदर मालाबाबत अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचेकडुन ट्रकमधील प्रतिबंधीत मालाची तपासणी करुन घेण्यात येत असुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या