तडवळा येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वटवृक्षाचा 11 वा वाढदिवस साजरा:
रिपोर्टर सागर पवार 
 5 जुन या  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अकरा वर्षापूर्वी पर्यावरण दिनी निरंतर शिक्षण केंद्रामार्फत काका धुमाळ यांनी जोपासलेल्या वटवृक्षाचा ११ वाढदिवस साजरा करण्यात आला. यावर्षी या वटवृक्षाचा वाढदिवसाचा केक कापण्याचा मान ढोकी येथील सामाजिक कार्यकर्ते राजपाल (दादा) देशमुख यांना देण्यात आला.यावेळी कोल्हापूर येथील न्यू कॉलेज चे प्राध्यापक डॉ विनोद शिंपले जन्मगाव तडवळे यांनी उपस्थित जमलेल्या  गावकऱ्यांना झाडाचे महत्व, पाऊस कमी प्रमाणात पडण्याची कारणे व सतत वृक्ष तोड होत गेल्यास पाऊस तर कमी पडणारच परंतु येणाऱ्या पुढच्या पिढीला ऑक्सिजन बरोबर घेऊन फिरावे लागेल त्यामुळे वृक्ष लागवड व त्याचे संगोपन आपण सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले त्यावरील उपाय सविस्तर सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच राजपाल देशमुख यांनी देखील मार्गदर्शन केले व तडवळे गावाला जांभूळाचे ३ झाडे भेट दिली. या वटवृक्षाचा पहिला वाढदिवस आ.राणादादा पाटील, दुसरा संजय(दादा) दुधगावकर, तिसरा दिलीप(दादा) करंजकर, चौथा माजी आ.ओमदादा निंबाळकर, पाचवा रामदादा जमाले, सहावा संताजी(दादा) पाटील, सातवा दिपक(दादा) निकाळजे, आठवा रामलिंग(दादा) सुरवसे, नववा पोपट(दादा) जमाले, दहावा दादा वाकडे यांच्या हस्ते करण्यात आला होता. यावेळी  वनस्पती शास्त्रज्ञ शिंपले, सरपंच किरण आवटे, ग्रा. पं . सदस्य विशाल दादा जमाले,बालाजी जमाले, धनाजी कुरुळे ,पत्रकार विकास उबाळे व प्रविण पालके, धनाजी नाळे, जगदीश सपाटे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या