शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा करण्यास सुरुवात- आ.राणाजगजीतसिंह पाटीलखरीप 2018 मध्ये जिल्ह्याला सोयाबीन पिकासाठी रु. 395 कोटी रुपये विमा जाहीर झाला होता, परंतु यावर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे सरव्यवस्थापक व चेअरमन कार्यकारी  व्यवस्थापक यांची स्वाक्षरी प्रलंबित होती. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा दैनंदिन पाठपुरावा सुरू होता. आज यावर स्वाक्षऱ्या झाल्या असून खरीप 2018 मधील सोयाबीन व कापूस पीक विम्यास अंतिम मंजुरी मिळाली असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पीक विम्याची रक्कम मोठी असल्यामुळे रोकड उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होत आहे. या अनुषंगाने देखील आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक व भारतीय रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यासाठी रोकड उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्याचप्रमाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना पिक विमा तातडीने शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्याचे सूचित केले आहे. भीषण दुष्काळाचा सामना करत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यातून थोडा फार तरी नक्कीच दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या