रिपोर्टर: राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने कळंब तालुकतील सातेफळ या गावी श्रमदानाचा कार्यक्रम राबवण्यात आला.या वेळी श्रमदान करण्यासाठी युवकासह गावातील लहान थेरांचा सहभाग होता.

पाणी फाउंडेशनच्या माध्यमातुन दुष्काळ मुक्तीसाठी राबवण्यात येत आसलेल्या श्रमादान या कार्यक्रमाच्या निमीत्ताने लहान थोर आबाल वृध्द या कामामध्ये आपला प्रत्यक्ष अपत्यक्ष सहभाग नोंदवत आहेत.त्या प्रमाणेच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने ही कंळब तालुक्यातील सातेफळ गावामध्ये श्रमदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी राष्ट्रवादी युवक कॉगेस चे जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर यांच्यासह आनेक सहकार्याची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या