प्रवीण कसपटे यांना द प्राइड ऑफ इंडिया पुरस्कार
रिपोर्टर: भास्कर ग्रुप तर्फे दिला जाणारा द प्राइड ऑफ इंडिया हा पुरस्कार बार्शी चे युवा उद्योजक श्री प्रवीण नवनाथ कसपटे यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकताच प्रदान झाला पणजी येथील दिनानाथ मंगेशकर कला ॲकॅडमी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार कार्यक्रमाचे आयोजन भास्कर ग्रुप यांनी केले होते या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांच्या भगिनी सौ वासंती बेन मोदी माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड.रमाकांत खलप तसेच गोवा राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर हेही उपस्थित होते माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आवाहन केले समाजातील विविध घटकांमध्ये अनन्यसाधारण काम करणाऱ्या व्यक्तींची देशभरातून निवड केली जाते व त्यातून हा पुरस्कार दिला जातो ज्यामुळे त्यांच्या कामाला उत्तेजना मिळते आणि जबाबदारीही वाढते असे डॉ प्रमोद सावंत यांनी नमूद केले हा पुरस्कार घेण्यासाठी बार्शीतील त्यांचे सहकारी मित्र ॲड. विक्रम सावळेॲड. विकास जाधव माणिक जी हजारे आणि ॲड विजय नवले हेही उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या