महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरातील नागरिकांना टॅंकरने मोफत पाणी पुरवठा




रिपोर्टर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील नागरीकांना टॅंकरने मोफत पाणी पुरवठा आजपासुन सुरू करण्यात आला आहे.मनसेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील प्रत्येक प्रभागात  मोफत पाणी वाटप करण्यात येणार आहे. 
दुष्काळपरिस्थिती अतिशय गंभीर असून नागरिक विकत पाणी घेऊन तहान भागवत आहेत यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दुष्काळी परिस्थितीला थोडीशी मदत व्हावी म्हणून पाण्याचे टॅंकर चालू करण्यात आले आहे.यावेळी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे,नगरपरिषदचे विरोधी पक्ष नेते युवराज नळे,यांच्या हस्ते पाणी सोडून सुरुवात करण्यात आली. युवा नेते राजसिंह राजेनिंबाळकर, वोबीसी नेते लक्ष्मण माने,व्यापारी संघाचे मुकेशजी नायगावकर,निलेश भोसले,सरपंच मुरली देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत शेटे,शशिकांत कुराडे सलीम आवटी,संजय पवार तन्मय वाघमारे यांच्यासह महिला व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या