पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम जास्त प्रमाणात राबवावा - सुधीर सस्ते          सध्याची दुष्काळाची दाहकता पाहता जास्तीत जास्त संस्थानी पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम हाती घेऊन काम करावे अशी अपेक्षा यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन सुधीर सस्ते यांनी व्यक्त केली.
          यशदा मल्टीस्टेट, इक्विटास बँक व एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित पाण्याच्या टाक्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.   
          भविष्यकाळात होणारी पाणीटंचाई व दुष्काळाची दाहकता लक्षात घेता आतापासुनच आपण कामाला लागले पाहिजे व त्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब मातीत जिरवला पाहिजे जेणे करुन नजीकच्या काळात पाणीटंचाई जाणवणार नाही असे ही यावेळी सुधीर सस्ते बोलताना म्हणाले. या तिन्ही संस्थेच्या वतीने खेड ता उस्मानाबाद या गावात दोन हजार व एक हजार  लिटर च्या टाक्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन इक्विटास बँकेचे क्लस्टर हेड कमल गांधी, भाई उध्दवराव पाटील पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख, एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष अमित कदम, युवा उद्योजक अभिजित शिंदे यांची उपस्थिती होती.
          एकता फाऊंडेशन चे सचिव आभिलाष लोमटे यांनी ग्रामसेवा युवा संघ करत असलेल्या कार्याबदल कौतुक करत गावकरी मंडळीनी एकञीत येऊन सातत्याने या पध्दतीने काम केल्यास आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु अशा विश्वास ग्रामस्थांना दिला.
          यावेळी इक्विटास बँकेचे क्लस्टर हेड कमल गांधी यांनी ही कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन सर्वातोपरी मदत करु अशी ग्याही दिली. भाई उध्दवराव पाटील पतसंस्थेचे सचिव अमरसिंह देशमुख यांनी असा स्तुत्य उपक्रम राबविल्याबदल तिन्ही संस्थेचे अभिनंदन करुन पतसंस्थेच्या वतीने ही एक पाण्याची टाकी देण्याचे आश्वासन दिले. स्वखर्चाने बलभीम गरड व कुमार लोमटे यांनी पाणी उपलब्ध करुन दिल्याबदल त्यांचा ही सत्कार यावेळी करण्यात आला.
          यावेळी इक्विटास बँकेचे मँनेजर प्रशांत जाधव, एकता फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष विशाल थोरात, यशदा  मल्टीस्टेट चे सीईओ प्रकाश गरड, ग्रामसेवा युवा संघाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या