आलेला पिक विमा तात्काळ वाटप करूण उमरगा,भूम,वाशी या तालुक्यातील शेतक—यांना सोयाबिनचा विमा मिळावा: शिवसेनेचे निवेदन!



रिपोर्टर:उडीद मुग व तुर या पिकाच्या पिक विम्याची रक्कम मार्च व एप्रिल महिन्यात शेतकर्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कोट्यावदी रक्कम पिकविम्याचा नुकसान भरपाई पोटी मार्च महिन्यात जमा झालेली असुन देखिल मे महिना उजाडला तरी जिल्हा बँकेने अद्याप एक रूपयाही शेतकर्यांना वाटप केलेला नाही.जिल्हा बँकेने दोन दिवसात वाटप न चालु केल्यास शिवसेना आपल्या स्टाईल आंदोलन करेल याची नोंद घ्यावी.तसेच जिल्हयातील उमरगा भूम वाशी या तीन तालुक्यातील शेतकर्यांना सोयाबिनच्या पिक विमा मिळावा तसेच शेतकरी नुकसान भरपाईपासुन वंचीत राहिला आहे.अधिकार्यांच्या व कर्मचार्यांच्या पीक कापणी प्रयोगाच्या चुकिच्या अहवालामुळे या तीन तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासुन वंचित राहिला आहे तरी या शेतक—यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ही मागणी या निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.
यावेळी  मा.आ.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटिल,संजय मामा निंबाळकर,डी सी सी बँकेचे संचालक संजय देशमुख,संजय पाटिल दुधगावर, धाराशिव तालुकाप्रमुख सतिश सोमाणी,भाजपा तुळजापुर तालुकाप्रमुख सत्यवान सुरवसे,शिवसेना तालुकाप्रमुख जग्गनाथ गवली,जि प सदस्य उध्दव साळवी,रवि कोरे आळणीकर,धनंजय इंगळे,अनंत भक्ते,धनंजय वीर,दिलीप जावळे,गोविंद कोळगे,बापु ढोरमारे,सौदागर जगताप,राजनारायण कोळगे,संजय भोसले,आदिसह शिवसैनिक युवासैनिक,विभागप्रमुख,शाखाप्रमुख,उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या