उस्मानाबाद शहरातील पाणी प्रश्न लवकर मिटवा..अन्यथा आंदोलन मनसेचा ईशारा:रिपोर्टर:उस्मानाबाद शहरात २३ ते २५ दिवसातुुन एकदा पाणी मिळत असून शहरात पाणी प्रश्न अतिशय गंभीर झाला आसल्याने शहरातील नागरिक पाणी विकत घेऊन ताहन भागवत आहेत.
 १८३ कोटी रुपये खर्च करून उजणी धरणातून पाणी उस्मानाबाद शहरासाठी आणले परंतू येवढे रूपये खर्च करून देखिल पाण्याची गळती सुरू आहे. त्या गळतीमुळे शहराला पाणी कमी पडत आहे. पाण्याची सुरू आसलेली गळती थांबवुन लवकरात लवकर शहराला सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा. नाही तर उस्मानाबाद शहरात नगरपरिषदच्या वतीने  टॅंकरने त्वरीत पाणी पुरवठा करण्यात यावा. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण न करता शहरातील जनतेला पाणी लवकरात लवकर कसे मिळेल हा प्रश्न महत्वाचा आहे.पाणी प्रश्न लवकर नाही मिटला तर  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर परिषद मध्ये "खळ् खट्याक्"अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन उस्मानाबाद नगरपरिषद मुख्यअधिकारी यांना मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी दिले आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या