डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केशर आंब्याच्या कलमांचे वाटपरिपोर्टर:राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खा. डा. पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुक्रवार ३१ मे रोजी पाटोदो व जहागिरदारवाडी येथील शेतक-यांना १०० केशर आंबा कलमाचे वितरण  कंपनीचे संचालक श्री.प्रकाश पवार व अनिल जाधव यांचे हस्ते शेतक-यांना करण्यात आले.
येथील उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट फार्मर्स फुड प्रोडयुसर कं. लि. उस्मानाबादचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री.अमोल पाटोदेकर यांनी डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १००० केशर आंबा कलमाचे वाटप करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी शुक्रवार ३१ मे २०१९ रोजी पाटोदा व जहागिरदारवाडी परिसरातील शेतक-यांना १०० आंबा कलमाचे वाटप करण्यात आले. उर्वरीत कलमांचे सप्टेंबर महिन्यापर्यंत टप्या-टप्यात वितरण होणार आहे.  यावेळी पाटोदा येथील आजी-माजी सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ व जहागिरदारवाडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कंपनीचे सर्व कर्मचारी, कामगार यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या