वेगवेगळे उपक्रम राबवित समाजामध्ये दिशा दर्शक काम करणारी संस्था म्हणजे एकता फाऊंडेशन - विश्वास मुंडे          समाजामध्ये विविध संस्था काम करतात पण एकता फाऊंडेशन ही संस्था सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता काम करणारी संस्था आहे असे गौरवउद्गार आयकर विभाग औरंगाबाद चे सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी काढले. एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने स्वाआधार मतीमंद मुलीची शाळा येथे महाराष्ट्र दिनादिवशी आयोजित दिव्यांग स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त मुलीच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन अँड. रोहन कोचेटा, युवा उद्योजक अभय कोचेटा, प्रशांत बोराणा, स्वआधार प्रकल्पाचे अध्यक्ष शहाजी चव्हाण,एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष अमित कदम व अभिमान हंगगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 ज्या मुली दिव्यांग असुन सुध्दा आपल्या जिद्दीने नवनिर्मिती च्या गोष्टी शिकत आहेत हि बाब कौतुकास्पद असुन अशा मुलींना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे ही प्रतिपादन यावेळी विश्वास मुंडे यांनी केले.दिव्यांग मुलींना जे येत नाही ते आधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न करुन जिद्दीने उभे राहावे असे ही यावेळी बोलताना म्हणाले.कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन व स्वागत गीत म्हणुन झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्तविक भाषणात एकता फाऊंडेशन चे सचिव आभिलाष लोमटे यांनी एकता फाऊंडेशनचा प्रवास सांगत कार्याची माहिती दिली व फाऊंडेशनच्या माध्यमातुन नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी सुचना व मार्गदर्शन करावे अशी ही विंनती केली. दिव्यांग मुलीनी सादर केलेल्या विविध गाण्यावरील नृत्यामुळे पाहुणे व उपस्थित मंडळी मंञमुग्ध झाले. त्याचबरोबर एकता फाऊंडेशन च्या वतीने आबा व अंजीर या वृक्षाचे संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करुन सामान्यां प्रमाणेच दिव्यांग वंचित विशेष चिमुकल्यांना आंबे, चिकु व केळी खाण्याचा मनमुराद आनंद लुटता यावा याकरिता मुलींसाठी फळे खाण्याची स्पर्धा पण घेण्यात आली. पुरस्कार प्राप्त मुलींना एकता फाऊंडेशन च्या वतीने मेडल व शैक्षणिक साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहाजी चव्हाण व सुञसंचालन रुपाली कांबळे यांनी केले. यावेळी कार्यध्यक्ष विशाल थोरात, यशदा मल्टीस्टेट चे सीईओ प्रकाश गरड, पांडुरंग पवार, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, सह्याद्री प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, पंकजसिंह रजपुत, श्रीनिवास मुंडे, आकाश लोकरे, मनोज कदम, धनाजी वारे, शाम गवाड, युसुफ सय्यद, मुख्याध्यपक गुरुनाथ थोडसरे व सर्व शिक्षकवृंद आदीची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या