राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरू:पुनर्वसन विभागाने पाठविला प्रस्ताव:

 राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठविला प्रस्ताव 

रिपोर्टर: राज्यातील यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने वित्त विभागाकडे पाठवला आहे. वित्त विभागाकडून मंजुरी मिळताच हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे. 

 राज्यात सन 2003 मध्ये पहिल्यांदा कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात आला होता.

 त्यानंतर 2015 मध्येही राज्यात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत.

 सुमारे 30 कोटी खर्च अपेक्षित : राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाला सादर केला आहे. या प्रयोगांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

 साधारण जुलै, ऑगस्टमध्ये राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न केले जातील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या