पालकमंत्री अर्जून खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण



 


उस्मानाबाद, येथील पोलीस मैदानावर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त व कामगार  दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण   पालकमंत्री श्री.अर्जून खोतकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी त्यांनी उपस्थित  स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी,पत्रकार बांधव आणि नागरिकांना  मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास माजी आमदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजा राम सामी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते,अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, , निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी(सामान्य प्रशासन) संतोष राऊत,उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे,   सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसिलदार अभय म्हस्के,  स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागांचे कार्यालयप्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या