रिपोर्टर:आज दिनांक 17/05/2019 रोजी मा.निवासी उपजिल्हाधीकारी राजेंद्र खंदारे उस्मानाबाद यांना दुष्काळावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत निवेदन देण्यात आले
या दाहक दुष्काळात राज्यातील अन्य विभागा प्रमानेच मराठवाड्यातील बहुतांश तालुके होरपळुन निघालेले आहेत या भागातील ग्रामस्थ,शेतकरी,शेतमजुर,नागकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेशाध्यक्ष मा.खा.अशोकरावजी चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली विभागीय समिती बनवुन त्यांच्या मार्फत प्रत्यक्ष पहाणी करण्याचे व त्याबाबत अहवाल राज्य शासनाला सादर करण्याचे ठरविले आहे त्याचाच भाग म्हणुन आज दिनांक 17/5/2019 रोजी आम्ही जिल्हा दौरा केला केलेल्या पहाणीत निदर्शनास समस्यावर तात्काळ उपाय योजना करणे न्याय व अत्यावश्यक आहे या उपाययोजना बाबत निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत आलेल्या शिष्टमंडळाने पाहणी दौऱ्यात अनुभवलेल्या अडचणी व उपाययोजना बाबत चर्चा केली व निवाशी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांना निवेदन देण्यात आले सदर शिष्टमंडळात निवेदनावर सही केलेल्या मान्यवरांचा समावेश होता

0 टिप्पण्या