पत्नीची हत्या, आरोपी पतीस विविध कलामाच्या आधारे २१ वर्षाची सजारिपोर्टर: पत्नीची हत्या प्रकरणी आरोपी पती किरण बाबासाहेब वाघमारे यास  विविध कलमाच्या आधारे २१ वर्ष ३ महिने व पाच हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा शुक्रवार १७ मे २०१९ रोजी सुनावली आहे. हे प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.ए.ए.आर औटी यांच्या न्यायालयात चालले.
याबाबत सरकारी वकील अॅड. अशिष कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील देव धानोरा येथे आरोपी किरण बाबासाहेब वाघमारे याच्या सोबत फियार्दी हणमंत भिमा गाडे यांची  बहिण अम्रपाली हिचे लग्न झाले होते. आरोपी पती किरण वाघमारे, सासरा बाबासाहेब वाघमारे, दिर हिम्मत वाघमारे, सासु मैनाबाई वाघमारे यांच्यासोबत मयत अम्रपाली सासरी राहत होती. आरोपी किरण वाघमारे यास दारूचे व्यसन होते. तो सतत दारू पिऊन पत्नी आम्रपालीस मारहाण करीत होता. मयत अम्रपालीस खूप त्रास होता. त्यावर फिर्यादी व त्याचा भाऊ असे मिळून मयत अम्रपालीच्या सासरी देवधानोरा येथे जावून तिला होत असलेल्या त्रासा संदर्भात विचारना केली असता. आरोपी किरण वाघमारे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू काढून किरण गाडे यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी फिर्यादी हणमंत  गाडे हे सोडविण्यास गेले असता, आरोपी किरण वाघमारे याने फिर्यादी हणुमंत गाडे यास जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांने चाकूने वार करून फिर्यादीस जखमी केले.  यावेळी मयत अम्रपाली सोडविण्यास आली असता. तिला ही आरोपी वाघमारे याने चाकूने वार करून तिला ढकलून दिले. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तसेच आरोपी किरणचा भाऊ हिम्मत वाघमारे यांनेपण फिर्यादी व फिर्यादीच्या भावास मारहाण केली.  व मयत अम्रपालीच्या सासू-सास-याने शिवीगाळ करून जीवे मारा सोडू नका, असे म्हणत धक्काबुक्की केली. या झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेली अम्रपालीस हॉस्पीटल मध्ये घेऊन जातेवेळी तिचा मृत्यू झाला.व फिर्यादी हणमंत गाडे हे बेशुध्द  झाले. यानंतर फिर्यादी शुध््दीवर आल्यावर उस्मानाबाद येथील सरकारी हॉस्पीटल येथे या प्रकरणाची त्यांनी पुलिसांना फिर्याद दिली.  त्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात कलम ३०२, ३०७, ३२४, ३२३ सह ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास एपीआय कोकणे यांनी करून न्यायालयामध्ये वरील आरोपीच्या विरोधात दोषारोपत्र दाखल केले.
या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधिश एस.ए.ए.आर औटी यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणी एकुण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी व फिर्यादी चा भाऊ याच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. तसेच इतर साक्षीदार सीए रिपोर्ट व विद्यकीय अधिकारी  यांची साक्ष नोंदविण्यात आली. समोर आलेल्या पुराव्या आधारे व सरकारी वकील अॅड. अशिष कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद या नुसार आरोपी  किरण बाबासाहेब वाघमारे यास विविध कलमाच्या आधारे २१ वर्ष ३ महिन्याची सजा व पाच हजार रूपयाच्या दंडाची शिक्षा सुनावणी आहे. आरोपीस हि शिक्षा एकत्रीत भोगावयाची आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी हिम्मत बाबासाहेब वाघमारे ३ महिने सजा व ५०० रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या