महाराष्ट्र दिना निमीत्त जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण:





रिपोर्टर: येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे  यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या व कामगार दिनाच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, पत्रकार बांधव आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते,पोलीस अधीक्षक राजा राम सामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी(सामन्य प्रशासन) संतोष राऊत,उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी चारुशिला देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. घाटगे,   सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, तहसिलदार अभय म्हस्के,  स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, विद्यार्थी, विविध विभागाचे प्रमुख, पत्रकार व अन्य मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या