
बोरगाव मंजू
रिपोर्टर:आजच्या धकाधकीच्या स्पर्धेच्या युगात मुलांची स्थिती अतिशय केविलवाणी आहे. त्यांना आधार देण्याची योग्य मार्गदर्शन करण्याची जवाबदारी खऱ्या अर्थाने पालका बरोबरच शिक्षकांवर येते मुले शिक्षकांचे जास्त ऐकतात तर विद्यार्थ्यांना समजून विश्वासात घेऊन योग्य मार्गदर्शन करुन भविष्यात विद्यार्थ्यांचे जीवन अधिक प्रभावी व यशस्वी होण्यासाठी व एक सक्षम नागरीक म्हणून भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी व्रत स्विकारावे असे आवाहन माजी आमदार प्रा.तुकाराम बिडकर यांनी केले . अनभोरा केंद्रातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत आगामी शैक्षणिक वर्षांपासून नियोजन व चिंतन गुणवत्ता आढावा सभेत बोलताना उपस्थित शिक्षकांना आवाहन केले.
भाऊसाहेब बिडकर विद्यालय अनभोरा येथे आयोजित शैक्षणिक नियोजन व आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तुकाराम बिडकर हे होते प्रमुख मार्गदर्शक शिक्षण विस्तार अधिकारी स्मिताताई परोपटे .क्रेद्र प्रमुख हेमंत कुलकर्णी,हे होते प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक विजय इंगळे,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम चव्हाण,सै.मासुम अली, शरदचंद्र मेहकरे , किरण मेश्राम, प्रशांत सारसकर , अर्चना शिंदे, राजेंद्र बोरे, सै.अनिस सै.अजीज , आदी उपस्थित होते, दरम्यान या एक दिवसीय सभेत शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता परोपटे, केंद्र प्रमुख हेमंत कुळकर्णी यांनी शाळा सिद्धी, विद्यार्थ्यांची संपादणुक आणि विकास मागील शैक्षणिक वर्षांतील आढावा व पुढील शैक्षणिक वर्षांपासून नियोजन आदी शैक्षणिक व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत नियोजन व अंमलबजावणी या विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले.सभेचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख हेमंत कुळकर्णी यांनी संचालन अध्यापक संजय तायडे, आभार मधुसूदन ढोरे यांनी केले यशस्वी करीता अध्यापक किरण इंगळे, संजय गावंडे,मनोज बाईस्कर , प्रमोद म्हैसने , सुनील चव्हाण, व्दारकानाथ चिलवंते , ललित उईके, यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या