सुविधा नसल्याने पोलीस मुख्यालयातील 30 कर्मचा—यांनी बदली साठी दिले पोलीस महासंचालकास निवेदन:रिपोर्टर: उस्मानाबाद येथिल जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचा—यांसाठी कसल्याही सुविधा नसल्याने वैतागलेल्या कर्मचा—यांनी आमची बदली करा असे निवेदन जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद यांना दिले आहे.

उस्मानाबाद येथिल पोलीस मुख्यालयामध्ये विविध पदावर कार्यरत आसलेल्या 30 ते 35 महीला व पुरूष कर्मचा—यांसाठी पिण्याचे पाणी,बाथरूम, इत्यादी सह काम करण्यासाठी लागणारी स्टेशनरी आदी सुविधांचा आभाव आसल्याने लिपीक यांच्या सह आनेक पदावर काम करणारे कर्मचारी परेशान झाले आहेत.कार्यालयामध्ये रिक्त पदे जास्त आसल्याने काही ठराविक कर्मचा—यांवर कामाचा भार पडत आसल्याने त्यांच्या वयक्तीक कामासाठी सुध्दा कर्मचा—यांना सुटटी मीळत नाही. त्यामुळे वेळोवेळी या कर्मचा—यांना आडचनीचा सामना करावा लागत आहे.गरबडीमध्ये काम करताना काही नकळत चुका झाल्या तर त्यांना शिक्षा ठोठावण्यात येते.या कारणामुळे संगळेच कर्मचारी दबावाखाली काम करतात.आशा प्रकारे जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्मचा—यांनी
 जिल्हाधिका—यांच्या मार्फत पोलीस महासंचालक औरंगाबाद यांना निवेदन देवून तात्काळ आमच्या बदल्या कराव्यात आशी मागणी केली आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या