राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे.
रिपोर्टर अधिवेशनाची रूपरेखा : या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प 18 जून रोजी मांडला जाणार आहे. यानंतर 21 व 24 जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. तर राज्यपालांचे अभिभाषण चर्चा 19 व 20 जून रोजी होईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे नियोजन ठरवण्यात आले आहे.
हे अधिवेशन तीन आठवडे चालणार असून, या अधिवेशनात कामकाजाचे केवळ 12 दिवस असणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार शक्यता! : पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 5 ते 10 जून दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
0 टिप्पण्या