उस्मानाबादेत 16 मे रोजी आंबा प्रदर्शन व मार्गदर्शन मेळावा फार्मर्स फुड प्रोडयुसर या कंपनीच्या वतीने आयोजन:
रिपोर्टर: आंबा फळाचे उत्पादन वाढुन ​आपल्या विभागातील शेतक—यांना आर्थिक मदत व्हावी या विषयाची जनजागृती करण्यासाठी डिस्ट्रीक फार्मर्स फुड प्रोडयुसर या कंपनीच्या वतीने उस्मानाबाद येथे 16 मे रोजी आंबा प्रदर्शन व मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आसुन या वेळी विविध नामांकीत संशोधक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.आशी माहीती डिस्ट्रीक फार्मर्स फुड प्रोडयुसर कंपनीचे मॉनेंजिग डायरेक्टर अमोल पाटोदेकर यांनी प्रत्रकार परिषदेमध्ये दिली.
सदर कंपनीने सघन आंबा या तंत्रज्ञानावर आधारित आंबा लागवड ते काढणी पर्यत तंत्रज्ञान व विक्री व्यवस्था याची साखळी विकशित कशा प्रकारे करण्यात आली आहे.या विषयी आंबा उत्पादकांना माहीती देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच जिल्हयामध्ये आंब्याचे उत्पादन घेणा—या शेतक—यां कंपनीच्या माध्यमातुन  शेती व शेती पुरक व्यावसायासाठी लागणा—या सर्व सेवा एकाच छताखाली 24 तास आॅनलाईन उपलब्ध करूण दिल्या जाणार आहेत.तसेच अत्याधुनिक शेती उपयोगी आवजारे,उपकरणे,औषधे शेतक—यांना त्यांच्या मागणी नुसार रास्त दरात पुरवठा केली जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी डॉ.हारीहर कौसडीकर संचालक संशोधन परिषद पुणे,डॉ.रणजीत धेवारे सहयोगी प्राध्यापक संशोधन केंद्र सिंधुदुर्ग, डॉ.गोविंद हांडे तांत्रीक सल्लागार पुणे,एम.बी.पाटील संशोधन केंद्र हिमायतबाग,जनार्धन वाघेरे आंबा उत्पादक शेतकरी नाशिक, प्राध्यापक अरूण कदम विदया विभाग लातुर आदी महाराष्ट्रातील नामांकीत मार्गदर्शक वक्ते. उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.आमदार राणा​जगजितसिंह पाटील या कार्यक्रमाचे उदघाटक आसतील तर डॉ.अजितसिंह पाटील,जीवनराव गोरे,आमदार राहुल मोटे,जिल्हाधिकारी दिपा मुधोळ,मुंडे,जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील,आदिची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.सदरचा कार्यक्रम उस्मानाबाद ये​थिल पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आसुन जास्तीत जास्त शेतक—यांनी आणि आंबा उत्पादकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे आसे आवहान डिस्ट्रीक फार्मर्स फुड प्रोडयुसर कंपनीचे मॉनेंजिग डायरेक्टर अमोल पाटोदेकर यांनी केले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या