हनुमान जयंती उत्सव का साजरा केला जातो जाणून घ्या काय आहे इतिहास: हानुमानाने कुठे केले भाषण:महाराष्ट्र लाईव्ह:

चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला, तो दिवस `हनुमान जयंती' म्हणून साजरा केला जातो. हनुमानाला भगवान शिवाचा रूद्रअवतार समजले जाते. त्यासोबतच 'पवनपुत्र', 'बजरंगबली' म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात हनुमानाला 'मारूती' असे देखील संबोधले जाते.

 जन्मकथा : हनुमान हा अंजनी आणि केसरीचा पुत्र आहे. हनुमानाच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. अमरत्वाच्या प्राप्तीसाठी जेव्हा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध पेटलं तेव्हा समुद्रमंथनातून अमृत असूरांनी पळवले.

त्यावेळेस भागवान शिवाने वीर्य त्याग केला आणि पवनदेव (वायुदेवता) वानरराज केसरी यांचा पत्नी अंजना यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. त्यामधून अंजनाने हनुमानाला जन्म दिला. हा दिवस चैत्र पौर्णिमेचा असल्याने या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.

 हनुमानाला शेंदूर व तेल का लावतात?
: हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात.

हनुमान म्हणजे 

 महापराक्रमी :  अनेक मोठमोठ्या विरांचा नाश केला. समुद्र उड्डाण, लंकादहन, द्रोणागिरी पर्वतही उचलून आणला. यावरून मारुतिराया किती महापराक्रमी होता, हे लक्षात येते. 

 निस्सीम भक्त : मारुतिराया केवळ पराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. मारुतिरायाला देवाच्या सेवेपुढे सर्व तुच्छ वाटत असे. असा भक्तच देवाला आवडतो.

 बुद्धीमान : मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते.

 जितेंद्रिय : मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही.

 भाषणकलेत निपुण असणारा : मारुती उत्तम वक्ता होता. त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला होता.

आज हनुमान जयंतीचा उत्सव देशभरात साजरा केला जातो आहे. हनुमानाच्या मंदिरात जाऊन तसेच घरी देखील हनुमानाची पूजा केली जाते. हनुमानाप्रमाणे शरीरयष्टी, ताकद प्राप्त व्हावी, त्यासाठी तरुणांमध्ये व्यायामाची गोडी निर्माण व्हावी, म्हणून समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात 11 ठिकाणी हनुमानाची मंदिरं स्थापन केली होती.
आज हनुमान जयंती दिवशी भक्त हनुमानाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. हनुमानाला तेलाचा अभिषेक करून रूईची फूलं आणि वडाच्या पानाचा हार अर्पण केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या