पोलीस अधीक्षक आर.राजा यांना उत्तम कामगिरी बद्दल सन्मान चिन्ह घोषित: महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या निर्णयाद्वारे पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये केलेल्या उत्तम कामगिरी बद्दल पोलीस अधिकारी / कर्मचारी यांना उल्लेखनिय प्रशंसनिय कामाबद्दल बोधचिन्ह/सन्मानचिन्ह प्रदान केले जाते. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा पोलीस विभागाचे प्रमुख आर.राजा.पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद हे गडचिरोली येथे नक्षलवादी भागात कार्यरत असताना त्यांनी सन 2018 मध्ये नक्षलवादयाविरुध्द केलेल्या उल्लेखनिय कामगिरी  बद्दल.आर.राजा पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद यांना राज्याचे पोलीस महासंचालक श्री सुबोध कुमार जयस्वाल यांनी दिनांक 23.04.2019 रोजीच्या एका कार्यालयीन आदेशाद्वारे पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह / प्रशस्तीपत्र घोषित केले आहे. हे सन्मान चिन्ह त्यांना 1 मे 2019 रोजी पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय उस्मानाबाद येथे संचलित होणाऱ्या परेड संचालनावेळी सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या