-एकता फाऊंडेशन चे काम अनुकरणीय - संजय मंञी 

रिपोर्टर: सातत्याने समाजाला दिशादर्शक आणि अनुकरणीय काम करत एकता फाऊंडेशन ने आपल्या कार्याचा ठसा उस्मानाबाद जिल्ह्यात निर्माण केला असल्याचे प्रतिपादन उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंञी यांनी केले. एकता फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने शिवतारा टायर आणि आँईल एजन्सी उस्मानाबाद येथे चालु करण्यात आलेल्या पाणपोई च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
          एकता फाऊंडेशन च्या पाणपोई उद्घाटन प्रसंगी इंडियन मेडिकल असो. अध्यक्ष डाँ. आदिनाथ राजगुरु, अँक्सिस बँक उस्मानाबाद शाखेचे मँनेजर किशोर पाटील, इक्विटास बँक उस्मानाबाद शाखेचे मँनेजर प्रशांत जाधव व व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
          यावेळी डाँ.आदिनाथ राजगुरु यांनी ही एकता फाऊंडेशन च्या कार्याचे कौतुक करत सध्या कडक उन्हाळा सुरु असल्याने या सार्वजनिक पाणपोईचा व्यापारी,पादचारी, बाजारकरु नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन केले.
          याप्रसंगी एकता फाऊंडेशन चे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात, चद्रंकांत दाजी इंगळे, प्रसाद देशमुख, रमेश दळवी, केदार लगदिवे,समर्थ देशपांडे, पंकज रजपुत,शिवा तुपे,दिपक चव्हाण,गोपाळ मिनीयार, शरीफ शेख,आखिल मोमीन,प्रकाश चिञावार व फाऊंडेशन चे सचिव आभिलाष लोमटे यांच्यासह व्यापारी, नागरिक उपस्थित होते.- 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या