कॉग्रेस राष्ट्रवादीमुळेच देश मजबुत बनला:शरद पवारमागील 70 वर्षात आम्ही देश घडवला केला

रिपोर्टर: राज्य आणि देशात उत्तम कारभार करण्याची कुवत केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत त्या क्षमता वेळोवेळी सिध्द केल्या आहेत. त्यामुळेच तर मागील 70 वर्षात जगाच्या नकाशावर एक समृध्द देश म्हणून आपण स्वत:ची ओळख निर्माण केली. इतिहासाचे आकलन कमी असलेले नरेंद्र मोदी मागील 70 वर्षात आम्ही काय केले ? असा सवाल उपस्थित करीत आहेत. त्यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करावा, मागील 70 वर्षात आम्ही देशाला मजबूत केले असल्याचे त्यांच्या आरोआप लक्षात येईल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केले.
संयु्नत पुरोगामी महाआघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ गुरूवारी उमरगा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सि. ना. आलुरे गुरूजी, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार बसवराज पाटील, अशोक पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, आमदार राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, शेकापचे भाई धनंजय पाटील, युवा नेते सुनील चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, रिपब्लिकन कवाडे गटाचे अॅड. मल्हारी बनसोडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पुलवामा प्रकरणाचे आम्ही कधीच राजकारण केले नाही. मात्र भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या वायफळ गप्पा पाहून शहिद सैनिकांच्या कुटूंबियांनी राजकीय फायदा घेणे थांबवा, अशा शब्दात कान उघडणी केली. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणल्याच्या थापा मारणारे कुलभूषण जाधव यांचे नाव आले की, 56 इंचाची छाती 15 इंचाची करून घेतात. सैनिकांनी गाजविलेल्या शौर्याचे श्रेय लाटू नका. 2014 पासून आजवर किती हल्ले झाले ? त्यात किती जणांना जीव गमवावे लागले ? याची माहिती जाहीर करण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही. देशावर मागील 70 वर्षात पावणे तीन लाख कोटी रूपयांचे कर्ज होते. मागील पाच वर्षांत त्यात कमालीची वाढ झाली आहे. हे कर्ज आता पाच लाख 40 हजार कोटींच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे जगातील कर्जबाजारी देशांच्या रांगेत या सरकारने आपल्याला नेवून ठेवले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना बेवारस म्हणून अपमान करणारांना जनता माफ करणार नाही. जोवर आपण आहोत, तोवर देशातील शेतकरी कधीच बेवारस होऊ देणार नाही. त्यासाठी शेतकरी, कष्टकर्‍यांचे प्रश्न समजून घेणार्‍या राणाजगजितसिंह पाटील यांना मोठ्या मताध्नियाने विजयी करा, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, देशासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. यावेळी गफलत झाली तर देश आणि देशाचे भवितव्य अडचणीत येईल ? त्यामुळे मजबूत लोकशाहीकरिता सध्या परिवर्तनाची नितांत गरज आहे. देशातील पुढच्या पिढीला सुकर भविष्य देण्याकरिता या सरकारला पायउतार करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि हे परिवर्तन आपण नक्की घडवून आणू, देशाला आजच्या टप्प्यावर आणण्यासाठी मागील 70 वर्षांत कॉंग्रेसने केलेले काम क्रांतिकारी आहे. कॉंग्रेसने सातत्याने देशातील नागरिकांच्या सेायीसुविधा आणि भविष्यातील गरज ध्यानात घेवून आखणी केली. त्यामुळेच आज भारत जागतिक पातळीवर एक सक्षम सत्ता म्हणून उदयास आलेला आहे. अॅटोमिक अॅनर्जी, स्पेस एनर्जी, सॅटेलाईट, टीव्ही, मोबाइल आदी तंत्रयुगाची सुरूवात कॉंग्रेसच्या काळात सुरू झाली आणि आज प्रत्येकजण या साधन सुविधांचा योग्य पध्दतीने लाभ घेत आहे. कॉंग्रेसच्याही काळात अनेकवेळा सर्जीकल स्ट्राईक झाले, परंतु सैन्याने गाजविलेल्या या शौर्याचा आपण राजकीय फायद्यासाठी कधीच उपयोग केला नाही. कॉंग्रेसने सैन्याचा आणि शहिद सैन्यांच्या कुटूंबियांचा कधीही अपमान केला नाही. मात्र आता विद्वेशाचे राजकारण सुरू आहे. त्याला दूर करून मजबूत लोकशाहीकरिता परिवर्तन घडविण्यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
माजीमंत्री तथा औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी, आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करीत असतानाच उमरगा आणि लोहारा तालु्नयातून 40 हजारांहून अधिक मताध्नियाने राणाजगजितसिंह पाटील यांना लिड देणार असल्याचे जाहीर केले. माजीमंत्री आमदार मधुकर चव्हाण यांनीही यावेळी उपस्थित जनसमुदायाला आघाडी सरकारच्या काळात केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती दिली आणि उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना मोठ्या मताध्नियाने निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकपर मनोगतात आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी मागील 40 वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांनी स्वत: दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह सांगितले. भविष्यात रोजगार, पर्यटन त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगांसाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमास लोहारा, उमरगा, औसा तालु्नयातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकपर मनोगतात आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी मागील 40 वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांनी स्वत: दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह सांगितले. भविष्यात रोजगार, पर्यटन त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगांसाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमास लोहारा, उमरगा, औसा तालु्नयातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या